आदित्य ठाकरेंच्या मदतीला अजितदादा धावून येतात तेव्हा…
स्थानिक बातम्या

आदित्य ठाकरेंच्या मदतीला अजितदादा धावून येतात तेव्हा…

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

कोकण विकास पर्यटनासाठी राज्य सरकार वेगळा निधी देणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते, मात्र पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही, यासाठी सरकार काय करणार असा प्रश्न विचारला.

त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर आदित्य यांनी देणे अपेक्षित असताना उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री या नात्याने उभे राहिले आणि त्यांनी याबाबतचे उत्तर दिले. यावरून अजित पवार यांनी आदित्य ठाकरे  अडचणीत येऊ नयेत म्हणून त्यांच्या मदतीला धावून जात सांभाळून घेतले.

यामुळे पहिल्यांदाच अधिवेशनातील प्रश्न उत्तरला सामोरे जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांना सांभाळून घेणाऱ्या अजित दादांचा वेगळाच चेहरा आज दिसून आल्याने महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते.

Deshdoot
www.deshdoot.com