नाशिक शहरात आज आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे हिस्ट्री…
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात आज आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे हिस्ट्री…

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात आज १६  रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या २५० वर पोहोचली आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत एकूण ११ रुग्णांचे मृत्यू झाले आहे तर ८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. नाशिक शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची वाढ झाली असून ५३ वर असलेले प्रतिबंधित क्षेत्र आता ६० वर पोहोचले आहेत.

आज नाशिक शहरात आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री अशी आहे.

१) सातपूर राजवाडा येथील १२ वर्षीय मुलीचा अहवाल करोना बाधीत आला आहे. जुन्या रुग्णाच्या संपर्कात हि मुलगी आलेली होती.

२) नाशिकरोड येथील ६४ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्णदेखील जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

३)दोंदे मळा,पाथर्डी फाटा येथील ८ वर्षीय मुलगाचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे.जुन्या रुग्णाच्या संपर्कातील हा मुलगा आहे.

४) गोसावी वाडी, नाशिकरोड येथील ३९ वर्षीय व्यक्ती व १२ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

५) पेठरोड, पंचवटी येथील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांचा कुटुंबातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता.

६)पेठरोड, पंचवटी येथील ५३ वर्षीय व्यक्ती व त्याच कुटुंबातील २१ वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे. जुन्या रुग्णाच्या संपर्कातील हे दोन्हीही रुग्ण आहेत.

७) मायको दवाखाना पंचवटी परिसरातील ३८ वर्षीय व्यक्ती व २९ वर्षीय महिला एकाच कुटुंबातील असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

८)कलानगर दिंडोरी येथील जुन्या रुग्णाच्या संपर्कातील २३ वर्षे युवतीचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे.

९)समता नगर टाकळी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

१०)वीर सावरकर नगर,सिडको येथील ७० वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला आहे.

११) शिवशक्ती चौक,सिडको येथील ३७ वर्षीय रहिवाशी व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा नवीन रुग्ण आहे.

१२)किशोर सूर्यवंशी मार्ग, समर्थ नगर येथील ६६ वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे.त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मार्केट यार्डात कामाला आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१३) गंगापूर रोडवरील शर्मीला अपार्टमेंट येथील ४९ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यांच्यावर बिटको हॉस्पिटल येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत. हेदेखील नवीन रुग्ण आहेत.

१४)बिडी कामगार वसाहत येथील ५७ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिनांक २ जून २०२० रोजी निधन झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com