Friday, April 26, 2024
Homeनाशिकधक्कादायक : साप मेलेल्या टाकीतील पाण्यातच भागवला आठवडा; इगतपुरीतील कथृवांगन पाड्याची व्यथा

धक्कादायक : साप मेलेल्या टाकीतील पाण्यातच भागवला आठवडा; इगतपुरीतील कथृवांगन पाड्याची व्यथा

प्रशांत निकाळे | एकिकडे संपुर्ण जगात करोनाने हाहाकार माजवला आहे. भारतात टाळेबंदी मे 17 पर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र तुर्ताच हैराण झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची सख्या ही वाढत आहे. प्रशासन स्वच्छता, सतत हाथ धुने अशा सुचना देत आहे. पण दुसरीकडे इगतपुरी आदिवासी तालुक्यातील कथृवांगन पाड्याची वेगळीच व्यथा आहे. हाथ धुने तर सोडाच एक घोट पाणी सुध्धा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे.

हा पाडा इगतपुरी नगरपरिषदेचे हद्दीत येतो.सुमारे 25 वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगरपरिषदेत करण्यात आला. परंतू परिस्तिती जैसे थे. या पाड्यात एकुण 45 घरे आहेत ज्यात जवळजवळ 200 लोक वस्तीकरुन राहतात.

- Advertisement -

पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने पाच वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकित हे पाणी साठवले जाते. आठवड्यात दोन वेळा जास्तीत जास्त 20 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणने आहे, आणि सध्या ते ही एकदाच मिळत आहे असे ही सांगण्यात आले. मागील आठवड्यात तेथील टाकीमध्ये मृत नाग आढळून आला. गावकरी तेच पाणी आठवडा भर पित असल्याचे तेथील स्थानिक अनिल भोईर यांनी सांगितले.

घडलेला प्रकार येथील रहिवाशांनी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाला सांगितला. मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. सध्या पाड्यावरील स्त्रिया 2 किलोमिटर रेल्वेरुळातून जीव धोक्यात घालुन पाणी आणत आहे. हे पाणीही एका नैसर्गिक स्त्रोतांतून उपलब्ध होत आहे. येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाने लक्ष्य द्यावे अशी मागणी केली आहे. मागील कित्तेक वर्षांचा वनवास आता संपविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील आदिवासी बांधवांनी दिला आहे.

“वेळोवेळी ही बाब आम्ही नगरपरिषदेच्या नजरेस आणुन दिली आहे. गावात येण्यासाठी रस्ता नाही अशे कारण पुढे केले जाते, यात आमची चुक काय. सुमारे 25 वर्षांपूर्वी हा पाडा नगरपरिषद हद्दीत गेला. तेव्हापासून फक्त मतदान मागण्यासाठी नगरसेवक येतात, काम मात्र काही नाही. विशेष म्हणजे आरोग्य, रस्ते, स्मशानभूमी अशी कुठली ही सुविधा इथे नाही.”

अनिल भोईर, स्थानिक

“आम्हाला रोज जीव धोक्यात घालुन पाणी आणावे लागते. रेल्वेरुळा पासून 2 किलोमिटर वर एक झरा आहे तेथून पाणी आणावे लागते. नगरपरिषदेने दिलेल्या नळाला फक्त 15 ते 20 मिनीट पाणी येत. येवढ्या मोठ्या वस्तिला ते कस पुरणार. प्रत्येक वेळी गावात भांडण सुरु होतात. रेव्ल्वे रुळावरून पाणी आणायचे तर सतत गाडी येण्याची भिती.”

विमल खाडे, स्थनिक महिला

- Advertisment -

ताज्या बातम्या