शेतकर्‍यांना दिलासा; शेतीसाठी गंगापूर व आळंदी धरणातून आवर्तन
स्थानिक बातम्या

शेतकर्‍यांना दिलासा; शेतीसाठी गंगापूर व आळंदी धरणातून आवर्तन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक ।  प्रतिनिधी

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जीवनावश्यक वस्तुपैकी भाजीपाल्यासह शेतीमालाच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये म्हणुन जलसंपदा विभागाकडुन गंगापूर व आळंदी धरणातून उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे आता शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणातून आता शेतीसाठी उन्हाळ्याचे आर्वतन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडुन घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसु लागला आहे. परदेशात व देशातील विविध बाजारपेठेत जिल्ह्यातून कांदा व द्राक्ष जात एसुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख शेतमालावर मोठा परिणाम झाला आहे.

याच प्रथम राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपुर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर वाहतुक अडविल्यानंतर शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. जगभरात कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने निर्यातीच्या शेतीमालावर देखील परिणाम झाला. अजुनही जिल्ह्यात सुमारे 30 द्राक्ष शेतात आहे.

यातच आता भाजीपाल्याचे भाव वाढत असल्याने याचा फटका नागरिकांना बसु लागला आहे. या एकुणच पार्श्वभूमीवर शेती माल वाचविण्यासाठी आणि भाजीपाला पुरवण्यावर परिणाम होऊ नये म्हणुन जलसंपदा विभागाने यंदाच्या उन्हाळच्यातील धरणांतून पहिले आर्वतन सोडण्यास प्रारंभ केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून नुकतेच पहिले आर्वतन सोडण्यात आले आहे. याचा मोठा फायदा द्राक्षासह भाजीपाला उत्पादनासाठी होणार आहे. यामुळे आता नाशिक व निफाड तालुक्यातील शेतकर्‍यांना कॅनालद्वारे पाणी मिळू लागले आहे. हे पाणी दोन्ही तालुक्यांना महिनाभर मिळणार आहे.

तसेच केवळ शेतीसाठी असलेल्या आळंदी धरणातील पहिले आवर्तन देखील सोडण्यात आले असुन आज आडगांव शिवारात पाणी पोहचले आहे. यामुळे सय्यदप्रिंप्री पर्यत शेतकर्‍यांना पुढेच 15 दिवस पाणी मिळणार आहे. अशाप्रकारे शेतकर्‍यांना धरणाचे पाणी मिळू लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com