जि. प.च्या दोन जागांसाठी आज मतदान
स्थानिक बातम्या

जि. प.च्या दोन जागांसाठी आज मतदान

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि.12) मतदान होत आहे. खेडगाव (ता.दिंडोरी) व गोवर्धन (ता.नाशिक) येथील गटांसाठी ही निवडणूक होत असून शुक्रवारी (दि.13) मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी खेडगाव जिल्हा परिषद सदस्यापदाचा राजीनामा दिला होता. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी हिरामण खोसकर यांनी गोवर्धन गटाचा राजीनामा दिल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.

तसेच मानूर (ता.कळवण) येथे गितांजली पवार या बिनविरोध निवडूण आल्यामुळे आता दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
गुरुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गटातील गावांमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जाईल. तसेच शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयालयात मतमोजणी होणार आहे.

खेडगावमध्ये दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत रंगली आहे. तसेच गोवर्धनमध्ये राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. पोट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com