video कोरोना जनजागृती : पद्‌मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नागरीकांना केले आवाहन
स्थानिक बातम्या

video कोरोना जनजागृती : पद्‌मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नागरीकांना केले आवाहन

Rajendra Patil

जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा प्रसार सर्वत्र झपाट्याने सुरू आहे. हे थांबविण्यासाठी व ‘कोरोना’ची साकळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला व सध्या सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीला प्रत्येक नागरीकाने आपले कर्तव्य म्हणून जबाबदारीने पालन करणे गरजेचे असल्याने रेवदंडा येथील थोर निरूपणकार पद्‌मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुध्दा समस्त जनतेला आवाहन केले आहे.

जनतेने गर्दीत जाणे टाळा, हात मिळविण्यापेक्षा नमस्कार करा, कोरोनाची भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घ्या, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना गर्दी होणार नहीयाची काळजी घ्या, अपवांवर विश्वास ठेवू नका, शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करा, हास्त स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, अनावश्यक घराबाहेर न पडता आपल्या कुटूंबासोबत घरातच रहा व पोलीस प्रशासनाला सहकार्य असे आवाहन डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com