भाजीपाला आवक निम्म्यावर; शेतकऱ्यांची किरकोळ बाजाराला पसंती
स्थानिक बातम्या

भाजीपाला आवक निम्म्यावर; शेतकऱ्यांची किरकोळ बाजाराला पसंती

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडॉऊनमुळे नाशिक मधुन मुंबईला जाणारा भाजीपाल्या निम्म्यावर आला असुन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून वाहनांची सख्या अर्ध्यावर आली आहे. गेल्या तीन चार दिवसात किरकोळ बाजारास चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी किरकोळ बाजारात विक्रीला प्राधान्य देत आहे. परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावात येणारा भाजीपाला निम्म्यावर आलां आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लॉकडाऊनच्या अगोदर मुंबईसाठी 50 ते 60 ट्रक भाजीपाला वाशी मार्केेट, तसेच कल्याण, भिवंडी, उल्हासनगर यासह उपनगरात जात होता.

उपनगरात अनेक ठिकाणी लहान लहान मार्केटमधील व्यापार्‍यांकडे नाशिकचा भाजीपाला पोहचत होता. आता मात्र लॉकडाऊननंतर केवळ वाशी मार्केट सोडले तर उपनगरात भाजीपाला पोलीस जाऊ देत नाही. यामुळे व्यापार्‍यांची मोठी कोंडी झाली आहे. आता वाशी मार्केट मध्ये पीकअप जीप आणि आयशर सारखी वाहने अशाप्रकारे 35 ते 40 वाहनाद्वारेच भाजीपाला जात आहे.

याचबरोबर गेल्या काही दिवसात नाशिक शहरातील अनेक उपनगरात भाजीपाला विक्रीला मुभा देण्यात आल्याने नागरिकांकडुन भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात असल्याने नाशिक मार्केट कमेटीत किरकोळ बाजाराची व्याप्ती वाढली आहे. लिलावापेक्षा किरकोळ विक्रीत शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत असल्याने त्यांंनी किरकोळ विक्रीला पसंती दिली आहे.

शेतकरी आता किरकोळ विक्रीसाठी 100 पर्यत जाळ्या आणत असुन दुपारनंतरच्या लिलावास मात्र शेतकरी कमी माल आणत आहे. याचा परिणाम मुबईला पाठविणार्‍या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com