मनपाच्या मोहीमेने भाजी विक्रेते मंडईच्या आत
स्थानिक बातम्या

मनपाच्या मोहीमेने भाजी विक्रेते मंडईच्या आत

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

सातपूरच्या अतिक्रमणीत भाजी बाजाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेला असून,अतिक्रमण विभागाने कठोर भूमिका घेत व्यवसायीकांना नेमुन दिलेल्या जागेवर बसण्याचे आवाहन केले. तसे न केल्यास दुकान जप्त केले जाईल यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा विभागिय अधिकार्‍यांनी दिल्यानंतर मात्र रस्ते मोकळे जाले.

रात्री उशिरापर्यंत पथक मंडई भोवती उभे असल्याने रस्ते मोकळे होते. मनपाच्या शिवाजी मंडई मार्केटमध्ये व्यवसायीकांना बसण्यासाठी जागा सोडण्यात आलेल्या होत्या. त्याठिकाणी पट्टे मारुन बायोमेट्रिक प्रमाणे बसवण्यात येणार होते.

मात्र या अतिक्रमणीत व्यवसायीकांना आत बसण्यापेक्षा बाहेरच बसणे जास्त सोयीचे वाटत असल्याने आतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्‍या व्यवसायीकांच्या धंद्यावर विपरित परिणाम झाला होता. परिणामी बाजार आत आणावा अन्यथा सर्व व्यवसायीक रस्त्यावर बसतील असा इशारा या व्यवसायीकांद्वारे देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर मनपाच्या कारवाईतील कठोरपरा लयास गेल्याचे दिसून येत असल्याचे या व्यवसायीकांचे मत होते. मात्र गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर काल मनपा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात मोहीम राबविण्यात आली. यावेळी व्यावसायीकांनी मोहिमेला विरोधकरण्याचा प्रयत्न यावेळी केला मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेत तो धुडकाऊन लावला.

Deshdoot
www.deshdoot.com