हिंगणघाट पिडीत तरुणीची मृत्यूशी झुंज संपली; दारोडा गावासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप
स्थानिक बातम्या

हिंगणघाट पिडीत तरुणीची मृत्यूशी झुंज संपली; दारोडा गावासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

वर्धा : हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज संपली. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

तिच्या मूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला.

पीडित तरुणीचे पार्थिव दारोडा या तिच्या मूळ गावी दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या गावामध्ये संतापाचे वातावरण आहे. संतप्त ग्रामस्थांकडून रुग्णवाहिकेवर दगडफेक करण्यात आली. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून केला जात आहे.

तरुणीच्या मृत्यूनंतर दारोडा या तिच्या मूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. असं कृत्य करण्याची धाडस होणार नाही असा कायदा करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच धीर धरा, योग्य तो निर्णय घेण्यात येईल. लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची सर्वच स्तरांतून मागणी केली जात आहे. गावात तणावाचे वातावरण, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार, अत्याचाराच्या घटनेविरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com