Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : रेल्वेमंत्री पियुष गोयल कुटुंबियांसह नाशकात; आई चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे...

Video : रेल्वेमंत्री पियुष गोयल कुटुंबियांसह नाशकात; आई चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

नाशिक | प्रतिनिधी 

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आज नाशिकमध्ये कुटुंबियांसह आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभेच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी आज सकाळी ते आले होते. गोदातीरी रामकुंडावर  विधिवत पूजन करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाजपनेते गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी (दि.०६)  सकाळी निधन झाले होते. गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

आपल्या आपुलकीने प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी गोयल यांनीच ट्विटरद्वारे दिली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन गोदातीरी रामकुंडावर करण्यासाठी गोयल कुटुंबियांसह नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती.

यानुसार आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यानंतर ते शिवनेरी ईमारत येथे गिरणा/गोदावरी सूट येथे थांबले. याठिकाणी त्यांच्या भेटीसाठी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील दाखल झाले होते. गोयल यांनी थोड्याच वेळात पंचवटीतील रामकुंड येथे जाऊन अस्थींची विधिवत पूजा करून रामकुंडात अस्थींचे विसर्जन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या