Video : भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी; शेतमालाच्या विक्रीसाठी नवा कायदा आणणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
स्थानिक बातम्या

Video : भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी; शेतमालाच्या विक्रीसाठी नवा कायदा आणणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

करोनाच्या महाभयानक संकटाला तोंड देण्यासाठी २० कोटींचे विशेष पॅकेज केंद्राने जाहीर केले आहे. यापार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्य मंत्री अनुराज ठाकूर आज सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती देत आहेत.

ते म्हणाले आतापर्यंत शेतकऱ्यांचे पिक कर्ज, किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचे दुध विक्री झाले नाही त्यांच्यासाठी वेगळी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेतील मुद्दे 

 • शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 • शेतकरी थेट बांधावरून आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमाल विक्री करू शकणार आहे
 • शेतकऱ्यांचा माल आता परवानाधारक व्यापारयांना का द्यावा लागतो. यासाठी केंद्रीय एक कायदा केला जाणार आहे. यातून शेतकरी त्यांचे उत्पादन चांगल्या दरात विक्री करू शकतील.
 • फूड प्रोसेसिंग मध्ये स्टाॅकचे लिमिट नसेल
 • कृषी क्षेत्रात अत्यावश्यक वस्तूंसाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे.
 • शेतकरी आणि स्थलांतरित मजूर यांच्यासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना त्यांनी घोषित केली. स्थलांतरित मजुरांना आधार कार्ड दाखवून रेशन कार्ड नसेल तरी मोफत रेशन मिळू शकेल.
 • सर्व स्थलांतरित मजुरांना दोन महिने मोफत धान्य मिळेल. 8 कोटी मजुरांना याचा फायदा मिळणार
 • रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ पहिल्यासारखं मिळेल.
 • रेशन कार्ड नसेल अशा स्थलांतरित मजुरांनासुद्धा 5 किलो तांदूळ आणि 1 किलो डाळ दिली जाईल. राज्य आपापल्या क्षेत्रातल्या मजुरांना ही मदत पोहोचवतील.
 • शेतकऱ्यांना कर्जावरचे व्याज माफ होणार
 •  3 कोटी शेतकऱ्यांना 4.22 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यांना पुढचे सहा महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे. 25 लाख नवी किसान
 • क्रेडिट कार्ड लोन दिली गेली
Deshdoot
www.deshdoot.com