Video : दिंडोरीतील संगमनेरमध्ये झिंगाट गाण्यावर फॉरेनर्स झाले ‘सैराट’

Video : दिंडोरीतील संगमनेरमध्ये झिंगाट गाण्यावर फॉरेनर्स झाले ‘सैराट’

ब्रिटीश बँण्डने आणली रंगत, गावकर्‍यांनी मानले आभार

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील संगमनेर येथे वॉटर व्हीलचे वाटप करण्यात आले. युके येथून आलेल्या परदेशी पर्यटकांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरत ग्रामस्थांचे लक्ष्य वेधून घेतले. युकेतील वेल्स ऑन व्हिल्स या सामाजिक संस्थेकडून सत्तर पेक्षा अधिक महिलांना वॉटर व्हिलचे वाटप करण्यात आले.

दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात महिलांना एक ते दिड किलोमिटर पर्यत डोक्यावर पाणि आणावे लागत होते. यावर पर्याय म्हणून वॉटर ऑन व्हिल्सच्या अनुषंगाने आता महिलांना पाणी ओढत आणता येणार आहे. यावेळी अ‍ॅलेसिस किंग या ब्रिटीश बॅन्डच्या हस्ते वॉटर ऑन व्हिल्सचे वाटप करण्यात आले.

वॉटर व्हील ओढून नेण्याची क्षमता 7000 किलोमीटर पर्यंत आहे. होळीचे औचित्य साधत भारतातील सण व उत्सव अनुभवण्यासाठी त्यांनी दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील संगमनेर येथे येवून रंगाची उधळण करत सामाजिक बांधिलकी जपली.
त्यानंतर संगमनेर येथील शाळेतील 1 ली ते 4थी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी यावेळी परदेशी पाहूण्यांचे स्वागत केले. यावेळी गावकरण्यांना वेल वेट आणि स्क्वेअर गाणी ऐकण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

यावेळी विदयार्थीना शालेय उपयोग वस्तूचे वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री हरी रेसटॉरंट्स मध्ये त्यांनी भारतीय जेवणाचा आस्वाद या परदेशी पाहूण्यांनी घेतला. यामध्ये भेंडीची भाजी, भरीत, भाकरी याचा आनंद घेतला.

यावेळी अजय देवरे, ऋषीकेश पडवळ, पियूष काकुळते व युके मधिल सैम फॅबीओ, ख्रिस्तीन, अ‍ॅलक्स, निक , माहीर, ज्योयी हे बँडमधील सदस्य उपस्थित होते. तर योगेश जाधव , निवृती गायकवाड , रविंद्र ठाकरे, महादेव बागुल, जयराम चौधरी, बाळू बागुल, संतोष साबळे, गणेश चौधरी, पंढरीनाथ गायकवाड, बाळू चव्हाण आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com