नवीन नाशिकमध्ये दोन वर्षांचा चिमुरडा करोना पॉझिटिव्ह; मालेगावात दिवसभरात ८ तर नाशिकमध्ये एक रुग्ण बाधित

नवीन नाशिकमध्ये दोन वर्षांचा चिमुरडा करोना पॉझिटिव्ह; मालेगावात दिवसभरात ८ तर नाशिकमध्ये एक रुग्ण बाधित

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये रात्री उशिरा आलेल्या अहवालात दोन वर्षीय चिमुरडयाचा अहवाल करोना बाधित आढळून आला आहे. हा चिमुरडा आधीच्या करोना बाधित रुग्णांचा हाय रिस्क संपर्कातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यासोबतच आज दिवसभरात  ८ बाधित रुग्णांची भर पडली. दुपारी एका अहवालात तीन, तर रात्री उशिरा आलेल्या दोन अहवालात तीन आणि दोन असे रुग्ण बाधित आढळून आले. आजची रुग्णसंख्या वाढल्यामुळे मालेगावातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६१६ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७८४ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील ७८४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 534 रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यात सर्वाधिक संख्या हि करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मालेगावमधील आहे. या ठिकाणी 428 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. नागरिकांचा प्रतिसाद, सर्व यंत्रणांचा समन्वय आणि नियोजनबध्द उपचार पध्दती या त्रिसूत्रीने करोनावर मात केल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दरम्यान, आज पॉझिटिव्ह 244 रुग्णांपैकी 208 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 36 संशयितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात दिलासादायक वृत्त असतानाच आज दिवसभरात ०९ रुग्णांची भर पडली. आज दुपारी १ वाजता ९३ अहवाल प्राप्त झाले होते.  यात ९० निगेटिव्ह तर ३ बाधित आले. यात ४० आणि ५५ वर्षीय महिला तर २४ वर्षीय तरुणाचा समावेश असून सर्व रुग्ण मालेगावमधील आहेत. त्यांनतर रात्री पावणेदहा वाजता ३५ अहवाल प्राप्त झाले. यात ३२ निगेटिव्ह तर ३ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ५२ वर्षीय महिला, ३० वर्षीय युवक आणि ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मालेगावमध्ये रात्री उशीरा तीन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात दोन पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे.  35 पैकी 32 रिपोर्ट या अहवालात निगेटिव्ह आले आहेत.

त्यानंतर रात्री पावणेअकरा वाजता ८० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६७ अहवाल निगेटिव्ह आले तर ११ अहवाल रद्द करण्यात आले उर्वरित दोन अहवाल बाधित आढळून आले आहे.  तसेच आज नाशिक शहरात एका २ वर्षीय बाळाला करोनाची लागण झाली. हा मुलगा आधीच्या बाधित रुग्णाचा हाय रिस्क संपर्कातील आहे. आज रात्री २२ अहवाल नाशिकमधून प्राप्त झाले यात १९ निगेटिव्ह तर २ अहवाल रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com