आम्ही चाललो आमच्या गावा! ९६ बसगाड्यांतून दाेन हजार मजूर रवाना

आम्ही चाललो आमच्या गावा! ९६ बसगाड्यांतून दाेन हजार मजूर रवाना

नाशिक | प्रतिनिधी

लाॅकडाऊनमुळे जिल्हयातील विविध भागात अडकलेल्या व महामार्गावरून घराकडे पायी जाणाऱ्या जवळपास दाेन हजार ११२ परप्रांतीय मजूरांना एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाने साेमवारी मध्यप्रदेशच्या सीमेवर साेडलेे. शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या माेहिमेतून नाशिक विभागाने साडेतीनशे पेक्षा जास्त बसमधून ५ हजाराहून आधिक परप्रातीयांना सीमेवर साेडले आहे. या माहिमेचे या मजूरांनी स्वागत केले असून जिल्हा प्रशासन व एसटीच्या आधिकाऱ्यांचे मनाेमन आभार मानले आहे.

उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे व एसटीचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्या प्रयत्नाने हजाराे मजूरांच्या घरवापसीचा प्रश्न मार्गी लागताे आहे. साेमवारी जिल्हा प्रशासन व एसटीने याबाबतचे नियाेजन करून नाशिक आगार एकमधून १८, आगार दाेनमधून १३, मनमाड ४, इगतपुरी ८, लासलगाव ९, पिंपळगाव बसवंत १२ अशा एकूण ६३ बसमध्ये मजूरांंची तपासणी व अन्य साेपस्कार पूर्ण करून रवाना केले. एका शिटवर एकच प्रवासी बसविण्यात आला हाेता.

ठाणे रस्त्याने नाशिकमार्गे शेकडाे मजूर पायी येत असल्याचे समजल्यावर यंत्रणेने तत्काळ नियाेजन केले. एकूण ७९२ मजूरांना पुढे येऊ न देता ३६ बस तेथे पाठवून गाडीत बसवल्यावर त्यांना मध्यप्रदेशच्या सीमेवर साेडण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

रविवारी रात्री आझर येथील मेन गेटजवळून मजूरांचा एक लाेंढा पायी जात हाेता. याचवेळी एका जागरूक नागरिकाने याबाबतची माहिती मुंडावरे यांना फोन करून सांगितली. वेळ न दवडता मुंडावरे यांनी लगेचच निफाडच्या तहसिलदारांना कळवून पुढील नियाेजन करण्याचे निर्देश दिले. यानंतर बस दाखल झाली. यावेळी मध्यप्रदेशात जाणाऱ्या या मजुरांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त करून यंत्रणे़ेचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com