नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक : शहरात सोमवारी (दि.१३) विविध ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. त्यात ६६ वर्षीय वृध्दासह १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

अशोक हिरामण महाजन (६६ रा.महालक्ष्मी रो हाऊस,कसमनगर पाथर्डी) व साई किरण बोरसे (१४ रा.साई गोदावरी अपा.पाटील गल्ली,जुने नाशिक) अशी आत्महत्या करणार्‍यांची नावे आहेत.

साई बोरसे या अल्पवयीन मुलाने सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या हॉलमध्ये पंख्याच्या कडीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

अशोक महाजन यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com