नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघा तरूणांनी रविवारी (दि.22) गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अमोल मधुकर पाटील (28 रा.पवननगर,सिडको) व रमाकांत विष्णू साळवे (32 रा.केतन संकुल,शिदे गाव) अशी आत्महत्या करणारया तरूणांची नावे आहेत.

अमोल पाटील याने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात सिलींग फॅनला साडीचा तुकडा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शिंदे करीत आहेत. तर साळवे यांनी रविवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी स्लॅपच्या हुकाला हिरव्या लाल रंगाची साडी बांधून गळफास लावून घेतला होता.

त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com