धुळे : निवृत्त शिक्षकाचे एटीएम चोरून पावणे दोन लाख काढले
स्थानिक बातम्या

धुळे : निवृत्त शिक्षकाचे एटीएम चोरून पावणे दोन लाख काढले

Balvant Gaikwad

फागणेतील घटना, तिघांवर गुन्हा

तालुक्यातील फागणे येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून एटीएम कार्डसह पासवर्डचे पाकीट चोरून कार्डव्दारे परस्पर पावणे दोन लाखांची रोकड काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सेवानिवृत्त शिक्षक लोटन भिला बडगुजर (वय 80 रा. फागणे) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 20 मार्च ते 18 मे 2020 दरम्यान संदीप रमेश धामणे (रा. लखमापुर ता. सटाणा जि. नाशिक), अविनाश चुनीलाल पाटील व सुरज विजय बडगुजर दोघे (रा. फागणे) या तिघांनी त्यांच्या घराच्या जिन्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा उघडून आत प्रवेश केला.

घरातून सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड व पासवर्ड बंद पाकीट चोरून लोटन बडगुजर यांच्या खात्यातून परस्पर एक लाख 71 हजार 815 रूपये चोरून नेले. त्यानुसार वरील तिघांविरूध्द धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com