धुळे : वाहनासह दोन लाखांचा गांजा जप्त
स्थानिक बातम्या

धुळे : वाहनासह दोन लाखांचा गांजा जप्त

Balvant Gaikwad

चाळीसगाव चौफुलीवर पोलिसांची कारवाई; तिघांना अटक

शहरातील चाळीगाव चौफुलीवर पोलिसांनी गांजाची वाहतूक करणार्‍या वाहनांसह तिघांना पकडले. वाहनासह 1 लाख 91 हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तिघांविरूध्द चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

चाळीसगाव रोड पोलिसांनी काल सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीवर एका वाहनाला (क्र. एमएच डी 3048) पकडले. वाहनातून 41 हजार रूपये किंमतीचा 8 किलो 200 ग्रॅम गांजा व दीड लाखांचे वाहन जप्त करण्यात आले.

तसेच राधेश्याम रामलखन विश्वकर्मा (वय 30), रमेश दीपक जगताप (वय 31) दोघे रा. वागले स्टेट, आयटीआय सर्कल जवळ, ठाणे पश्चिम व जहागी मोहीद्दीन शेख (वय 51 रा. तुलसीपाडा, भांडुप, मुंबई) या तिघांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी पोकाँ पी.व्ही.पाटील यांच्या फिर्यादीवरून गांजा सदृष्य अंमलीपदार्थाची बेकायदेशीरित्या चोरट्या पध्दतीने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना मिळुन आल्याने वरील तिघांविरूध्द चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि ठाकरे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com