इंदिरानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
स्थानिक बातम्या

इंदिरानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक l कालपासून नाशिकमध्ये बिबट्या शिरल्याच्या घटनेने खळबळ उडवून दिलेली असतानाच आज बिबट्याच्या हल्ल्यात दोन पुरुष गंभीर घटना घडली. इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटीच्या आवारात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या आला होता. बिबट्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.

सुपडू अहिरे(वय 66) व राजेंद्र निवृत्ती जाधव (वय 53) असे जखमी पुरुषांची नावे आहेत. हल्ल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.

हल्ला करून बिबट्याने धूम ठोकली आहे. कालही नाशिकमध्ये कॉलेजरोड परिसरात एका घरकाम करणाऱ्या महिलेवर सकाळच्या सुमारास हल्ला केल्याची घटना घडली होती. बिबट्याचा संचार मानवी वस्तीत वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातील दोघांवर नाशिक शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com