म्हसरूळच्या सीता सरोवरात बुडून दोघांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

म्हसरूळच्या सीता सरोवरात बुडून दोघांचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पंचवटी | वार्ताहर 

येथील प्राचीन सीता सरोवरात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकाराने परिसरात शोककळा पसरली.

काही मित्र या सरोवरात रात्री उतरले. त्यातील हेमंत श्रीधर गांगुर्डे (32, रा. राजू नगर, पूर्वीचे नाव वैतागवाडी, म्हसरूळ) व हर्षल उर्फ विकी राजेंद्र साळुंखे (34, रा. ओमकार नगर, किशोर सूर्यवंशी रोड, म्हसरूळ) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मृत्युमुखी पडले.

येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हर्षल उर्फ विकीने दिंडोरी रोडवरील एक हॉटेल काही महिन्यांपूर्वी चालवायला घेतल्याचे समजते. तसेच तो खाजगी कंपनीतही कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.

हेमंत याचा इलेक्ट्रिक कामाचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com