निमाणीनजीक अपघात; दोघांना भरधाव कारने चिरडले
स्थानिक बातम्या

निमाणीनजीक अपघात; दोघांना भरधाव कारने चिरडले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पंचवटी | प्रतिनिधी 

भरधाव कारने दोघांना चिरडल्याची घटना आज सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली. निमाणीकडून भाजी घेऊन पेठरोडकडे पायी जात असलेल्या महिला आणि पुरुषाला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. या घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते.  अपघात इतका भीषण होता की, मागे-पुढे चालत असलेले दोघेही रस्त्याच्या वेगवेगळ्या दिशेला फेकले गेले आहेत. कारचालक कार घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच रुग्णवाहिकेत दोघेही देह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तसेच पोलीस प्रत्यक्षदर्शीकडून आणि अपघातावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांकडून कारचे वर्णन जाणून घेत असून मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

यावेळी घटनास्थळी काही प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनी गर्दी दूर करून वाहतूकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अधिकृत माहिती मात्र, जिल्हा रुग्णालयातून प्राप्त होऊ शकली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच 

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com