नाशकात आज करोनाचे दोन बळी; पोलीस कर्मचाऱ्यासह, ठाणे जिल्ह्यातील वाहनचालकाचा समावेश
स्थानिक बातम्या

नाशकात आज करोनाचे दोन बळी; पोलीस कर्मचाऱ्यासह, ठाणे जिल्ह्यातील वाहनचालकाचा समावेश

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव पाठोपाठ नाशिकमध्येही करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये गेल्या दोन  दिवसांत करोनाचे पाच बळी गेले आहेत. आतापर्यंत तीन पोलिसांना करोनाच्या संसर्गामुळे वीरमरण आले आहे. सर्व पोलीस मालेगावी कर्तव्य बजावत होते. आज (दि. २६) रोजी कॉलेजरोड भागातील विसे मळा येथील पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे आज खासगी वाहनाने कामगारांना उत्तरप्रदेशला कामगारांना पोहोचविण्यासाठी गेलेल्या ठाणे येथील चालकाचा परतीच्या प्रवासात करोनाबाधित होऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (दि.२५) रात्री मृत्यू झाला.

ठाणे परिरातील वागळे इस्टेट परिसरात राहणारे 54 वर्षीय व्यक्ती हा चालक आहे. चादवड येथे त्यांच्या नातलगांकडे ते गेल्याचे समोर आले आहे. १८ मे ला परतीच्या प्रवासादरम्यान चालकास करोनाची लागण झाली होती.

कामगारांना उत्तर प्रदेशात पोहोच करण्यासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर ते परतीचा प्रवास करीत असताना गेल्या १८ मे ला चांदवडमध्ये नातेवाईकांकडे आले असता त्यांना ताप, खोकला आणि श्‍वसनाचा त्रास होऊ लागला.

त्यामुळे त्यांना चांदवड येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतल्यानंतर तब्बेत अधिक बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१९ मेला त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर उपचारादरम्यान त्यांना न्युमोनियाचा त्रास वाढला. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेल्याने सोमवारी (दि. २५) रात्री त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा ५५ झाला आहे. तर, परजिल्ह्यातील हा दुसरा बळी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com