कोरोना : जिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संशयित 2 रुग्ण दाखल
स्थानिक बातम्या

कोरोना : जिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संशयित 2 रुग्ण दाखल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पॉझिटीव्हच्या संपर्कातील दोघांचे अहवाल निगेटीव्ह

जळगाव –

जिल्हा रुग्णालयात गुरुवारी जळगाव शहरातीलच आणखी कोरोना संशयित दोन तरुण रुग्णांना दाखल करण्यात आले. तर या अगोदर पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या कोरोना संशयित दोन्ही रुग्णांच्या लाळीच्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

जळगाव शहरातील एक वाहनचालक मुंबईत विदेशी पर्यटकांच्या संपर्कात आला होता. त्याने या पर्यटकांना त्याच्या वाहनात काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले होते.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो जळगावात आला. त्याला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास झाला. त्यामुळे त्याने जिल्हा रुग्णालयात येवून स्वेच्छा तपासणी करुन घेतली.

तसेच शहरातील एक डॉक्टर दुसर्‍या दवाखान्यात प्रॅक्टीसला गेला होता. त्या डॉक्टरने एका गंभीर स्थितीतील रुग्णावर काही दिवस उपचार केले. परंतु, त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काही दिवसाने उपचार करणार्‍या डॉक्टरलाही ताप, सर्दी, खोकल्याचा अधिक त्रास झाला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने डॉक्टरने जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेतली.

दोघं संशयितांच्या लाळीचे नमुने घेतले असून ते पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. सध्या कोरोना नियंत्रण कक्षात गुरुवारी दाखल झालेले संशयित दोनच रुग्ण आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com