लासलगावमध्ये 2 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ; उद्यापासून बाजार समिती बंद

लासलगावमध्ये 2 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ;  उद्यापासून बाजार समिती बंद

लासलगाव | वार्ताहर 

लासलगावमध्ये 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ  उडाली आहे. एका खाजगी डॉक्टर व  पिंपळ्गांव नजिक मधील महिलेस करोंना बाधा झाल्याचे काल रात्री निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी रात्रीपासूनच याठिकाणी बंदोबस्तात वाढ केली असून आज मेडिकल व कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल लिलाव वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. लासलगांव व पिंपळगांव नजीक परिसर पुर्णपणे सील केल्यानंतर रुग्ण आढळून आलेले ठिकाण प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे.

नाशिक जिल्ह्यात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मंगळवारी उशिरा रात्री आलेल्या संशयित 79 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यात लासलगावतील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या 463 झाली. 29 मार्च रोजी लासलगाव जवळच्या पिंपळगाव नजिक की या गावी पहिला करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. मात्र त्यानंतर 40 दिवसांमध्ये लासलगाव मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने लासलगाव करांची चिंता वाढली आहे.

चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने लासलगाव येथील खाजगी डॉक्टर आणि नर्सचे मंगळवारी उशिरा रात्री करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगावसह वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचेच धाबे दणाणले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव, पिंपळगाव नजीक या गावात शंभर टक्के लॉक डाऊन करण्यात आले असून लासलगाव बाजार समितीत कांद्याची आलेली आवकेमुळे रस्त्यावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली आहे. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे.

खाजगी डॉक्टरच्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या ची यादी तयार करण्याचे काम दिवसभर सुरू होते. १ ते ३ मे तीन दिवस पुर्णपणे लॉकडाउन पाळण्यात आला.

आज दि ६ रोजी शासनाने दुकाने खुली करण्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होतात दुकानदार मध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवारी रात्री दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण लासलगाव परिसरात कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे.

लासलगाव मार्केट बेमुद्दत बंद

लासलगांव बाजार आवरावर आज विक्रीसाठी आलेल्या  926 वाहनांमधील 17956क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. कमीत कमी 301 जास्तीत जास्त 951 व सरासरी 630 रुपये भावाने खरेदी झाला. लासलगांव परिसरात कोरोना संसर्ग संशयित रुग्ण आढळून आल्याने तीन कि.मी. परिघाचे क्षेत्र कॉन्टनमेन्ट परिसर म्हणून घोषित झाल्याने उद्या दि. 7 पासून पुढील सुचना मिळे पर्यंत लासलगाव बाजार समितीतील शेतीमालाचे लिलाव बंद राहणार आहे.

  •  एकाच दिवसात जिल्ह्यात 79 संशियत्यांचे आवाहल पॉझिटिव्ह
  •  लासलगावात दोन पॉझिटिव्ह रुग्णात एक डॉक्टर ,एक नर्सचा समावेश
  •  हाय रिक्स आणि लो रिक्स संशियत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निघण्याची शक्यता
  •  आज पासून पुढील आदेशपर्यंत लासलगाव ,पिंपळगाव नजीक गाव शंभर टक्के लॉक डाऊन
  •  लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव आज पासून बंद
  • पोलिसांची वाहनधारकांनाची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगलीच दमछाक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com