हरसूल : शिवाजीनगर पाझर तलावात दोन सख्ख्या बहिणींसह एकीचा बुडून मृत्यू
स्थानिक बातम्या

हरसूल : शिवाजीनगर पाझर तलावात दोन सख्ख्या बहिणींसह एकीचा बुडून मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवरगाव शिवाजीनगर रस्त्यावर असलेल्या शिवाजीनगर शिवारात काल दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

जिजा सोनु बेंडकोळी (वय ९), धनश्री सोनु बेंडकोळी  (वय ८) व स्वप्नाली यशवंत बेंडकोळी (वय ६) अशी या मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती हरसूल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली, स्थानिकांच्या मदतीने तिघाही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा मृतांच्या नातलगांच्या ताब्यात मृतदेह सोपविण्यात आले. शोकाकुल वातावरणात दोन्ही सख्या बहिणींसह एका चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com