गावठी पिस्तुलसह ३८ जिवंत काडतुसे हस्तगत; तिघे ताब्यात
स्थानिक बातम्या

गावठी पिस्तुलसह ३८ जिवंत काडतुसे हस्तगत; तिघे ताब्यात

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

संगमनेर | प्रतिनिधी

गावठी बनावटीचे पिस्तुल व 38 जिवंत काडतुसे बाळगणार्‍या तिघांना शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी शिवारात करण्यात आली.

दिलीप कोंडीबा खाडे (वय 28, रा. म्हस्के बुद्रुक ता. शिरुर, जि. पुणे), बाबाजी बबन मुंजाळ (वय 27, रा. डोंगरगाव ता. शिरुर, जि. पुणे), दयानंद मारुती तेलंग (वय 33, रा. टाकळीहाजी, ता. शिरुर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

हे तिघे जण त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एम. एच.14 ए. व्ही. 3600 मधून प्रवास करत होते. दरम्यान शहर पोलिसांनी रायतेवाडी शिवारात त्यांचे वाहन अडवून त्यांना पकडले.

त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तुल व 38 जिवंत काडतुसे मिळून आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com