१४ क्विंटल कापूस लंपास
स्थानिक बातम्या

१४ क्विंटल कापूस लंपास

Balvant Gaikwad

धुळे  – 

तालुक्यातील कावठी शिवारातील शेतातून चोरट्यांनी 69 हजार रुपये किंमतीच्या 14 क्विंटल कापसासह भुईमुंग शेंगा, बाजरी व हरभरा नेला आहे.  याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकरी गजानन दगडु इंगळे (वय 49) यांचे कावठी शिवारात शेत आहे.  दि. 19 रोजी सायंकाळी 6 ते दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेताच्या संरक्षण भितीच्या गेटचे कुलुप तोडुन व शेतातील बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

43 हजार रुपयांचे 14 क्विंटल कापुस, 8 हजारांच्या दोन क्विंटल भुईमुग शेंगा, 9 हजार रुपये किंमतीच्या दीड क्विंटल हरभरा, 9 हजारांची साडेचार क्विंटल बाजरी असा एकुण 69 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी गजानन इंगळे यांनी सोनगीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com