‘या’ आहेत सर्वात महागड्या अभिनेत्री; दीपिकाचा नंबर कुठे जाणून घ्या!
स्थानिक बातम्या

‘या’ आहेत सर्वात महागड्या अभिनेत्री; दीपिकाचा नंबर कुठे जाणून घ्या!

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

फोर्ब्सच्या यादीत २०१९ च्या १०० सगळ्यात महागड्या व्यक्तींची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये क्रिकेटरपासून बॉलीवुड स्टार पर्यंत, सगळ्यांचा समावेश आहे.

जैकलीन फर्नांडीज : हल्लीच्या ड्राइव वेबसीरीज आणि साहो सारख्या चित्रपटात जैकलीन आपल्याला दिसली होती. जैकलीन फर्नांडीजची यावर्षाची कमाई ९.५ कोटी रुपये एवढी आहे.

माधुरी दीक्षित : लोकप्रिय टीवी शो ‘डांस दीवाने’ ची जज माधुरी दीक्षित यांनी जजिंग शिवाय, कलंक आणि टोटल धमाल सारख्या चित्रपटात काम केले आहे. या वर्षाची त्यांची कमाई १०.३८ कोटी रुपये झाली आहे.

भारती सिंह : या यादीत एक नाव कॉमेडियन गर्लभारती सिंह यांचे आहे. आपणास सांगू इच्छितो कि भारती सिंह एक अभिनेत्री आहे, जी खिलाड़ी 786 आणि सनम रे सारख्या चित्रपटात अभिनय केला आहे. या वर्षी भरतीची कमाई १०.९२कोटी रुपये आहे.

परिणीति चोपड़ा : वर्ष २०१९ मध्ये १२.५ कोटी रुपयेची कमाई करणारी परिणीति चोपड़ा यावेळी केसरी आणि जबरिया जोड़ीमध्ये नजरेस आली. त्यांची आगामी चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ लवकरच यावर्षी प्रदर्शित होत आहे.

कंगना राणावत : यावर्षीची कंगनाचा चित्रपट ‘जजमेंटल है क्या’ आणि मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीमध्ये दिसली होती. २०१९ ला कंगनाची कमाई १७.५ कोटी रुपयेआहे.

प्रियंका चोपड़ा : देसी गर्लने यावर्षी २ हॉलीवुडचे चित्रपट आणि बॉलीवुड चित्रपट ‘द स्काई इज पिंक’मध्ये आपणास दिसली होती. यावर्षी प्रियांकाने २३.४ कोटी रुपये कमविले आहे.

कटरीना कैफ : अभिनेत्री कटरीना कैफ या वर्षी सलमान खानचा चित्रपट भारतामध्ये आपणास दिसली होती. या वर्षी कटरीनाची कमाई २३.६३ रुपये एवढी आहे.

अनुष्का शर्मा : कोणत्याही चित्रपटशिवाय नंबर ३ची जागा मिळवत या वर्षी अनुष्का शर्मा ने २८.६७ कोटी रुपये कमविले आणि हि सगळी कमाई अनुष्काने जाहिरातीच्या माध्यमातून कमविले.

दीपिका पादुकोण :  दीपिका पादुकोण चित्रपट यशस्वी होण्याकरिता प्रचंड महंत करते हे सगळे जाणतातच. तिने प्रेक्षकांना एकमागोमाग एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. बॉलीवुडची सर्वात यशस्वी अभिनेत्री कमाई च्या बाबतीत सर्वात अग्रेसर आहे. तसेच तिने दुसरे स्थान पटकावले आहे. लवकरच दीपिका “छपाक” या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर दीपिकाने या वर्षी ४८ कोटीं रुपये कमविले आहे.

आलिया भट्ट : स्टुडेंट ऑफ द इअर मधून डेब्यु केलेली आलिया भट्टने लवकरच चित्रपट क्षेत्रात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हायवे, कलंक आणि गली बॉय हीरोइन आलिया भट्टने यंदा मोठं मोठ्या अभिनेत्रिना मागे टाकून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या नुसार आलियाची या वर्षाची कमाई ५९.२१ कोटीं रुपये आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com