ऑलम्पिक मेडल मिळवणे हेच ध्येय : हर्षवर्धन सदगीर
स्थानिक बातम्या

ऑलम्पिक मेडल मिळवणे हेच ध्येय : हर्षवर्धन सदगीर

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

देवळाली कॅम्प । वार्ताहर
भगूरच्या मातीतून कुस्तीचे धडे घेऊन महाराष्ट्र केसरीचा गदा पहिल्यांदाच मिळवून दिली या मागे गुरू ऍड गोरखनाथ बलकवडे,काका पवार, आईवडील यांचे मोठे परिश्रम असून देशाला ऑलम्पिकचे पदक मिळवून देणे हे आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने भगूर येथे केले.
महाराष्ट्र केसरी झाल्या नंतर हर्षवर्धन सदगीरचा भगूर येथे जाहीर नागरी सत्कार येथील शिवाजी चौकात आयोजित करण्यात आला होता. त्याच्यासह केसरी स्पर्धेत विविध गटात पदक मिळवणाऱ्या सागर बर्डे, रमेश कुकडे, धर्मा शिंदे, भाऊराव सदगीर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर आमदार सरोज आहिरे, हिरामण खोसकर,सीमा हिरे, गिरीश पालवे,दीपक बलकवडे, प्रदेश कॅग्रेस चे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, विष्णुपंत म्हेसधुने, कावेरी कासार, राजेंद्र लोणारी, उत्तम दळवी, भगवान जुन्द्रे, पुरुषोत्तम कडलग, हरीश भडांगे, रतन चावला, मधुसूदन गायकवाड, वाळू नवले, रोहिदास गोवर्धने, गणपत चुंबळे, विजया बलकवडे, प्रकाश बलकवडे, ज्ञानेश्वर शिंदे, एन. डी. गोडसे, दीपक वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार आहिरे, आमदार खोसकर यांनी हर्षवर्धन मुळे नाशिक जिल्ह्याचे नाव संपुर्ण देशात पसरले आहे, त्याला शासनाच्या माध्यमातून भरीव मदत केली जाईल. बलकवडे व्यायामशाळेने पाहिलवांनाबरोबर माणसे घडविण्याचे काम केले आहेत.
यावेळी प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी शासनाने सदगीर यांना पोलिस अधीक पदावर नियुक्त करावे यासाठी आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सदगीर चे गुरू ऍड. गोरखनाथ बलकवडे यांनी हर्षदच्या रूपाने नाशिकचा महाराष्ट्र केसरी बनविण्याचे स्वप्न साकार झाले आहेत.
३५ वर्षांपासून व्यायामशाळेच्या माध्यमातून केलेल्या संस्कारामुळे आज पोलीस दलात 3500, लष्करात 2000 विद्यार्थी कार्यरत आहेत. आजही 250 मुले व 30 मुली येथे कुस्तीचे धडे घेत आहेत. पहिलवान हीच संपत्ती असून सावरकरांच्या जन्मभूमीचा हा गुणधर्म आहे सदगीरच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भगूर नगरपालिकेचे नगरसेवक दीपक बलकवडे यांनी हर्षवर्धन सदगीरला 25 हजाराची बक्षीस जाहीर केले. यावेळी मधुसूदन गायकवाड, उत्तम दळवी, विष्णुपंत म्हेसधुने ,वाळू नवले आदींची समयोचित भाषणे झाली.
प्रस्ताविकातून प्राध्यापक रविंद्र मोरे यांनी नाशिक जिल्ह्याच्या कुस्तीगीर परिषदेचा अहवाल सादर करतांना १९९५ मध्ये राजेंद्र लोणारी  उपमहाराष्ट्र केसरी मल्ल केसरी झाला होता. मात्र हर्षवर्धन च्या रूपाने खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा गदा मिळाली आहे तर विशाल बलकवडे यांनी हर्षदच्या जडणघडनिचा आलेख सादर केला.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्ती पूर्वीची हर्षवर्धनची मानसिकता तयार करतांना त्याला कुटुंबापासून दूर ठेवले होते. कोणताही मानसिक दबाव त्याच्यावर नसावा तसेच कुस्तीच्या सहा मिनिटांचे नियोजन करतांना पाहिले तीन मिनिटे एका गुणाने पिछाडीवर रहायचे व दुसऱ्या तीन मिनिटातील शेवटच्या तीस सेकंदात हल्ला चढवायचा हे सूत्र ठरले होते.
त्यानुसार हर्षदने खेळ केला व तो महाराष्ट्र केसरी झाला. सूत्रसंचालन प्रशांत कापसे तर आभार प्रेरणा बलकवडे यांनी केले. कार्यक्रमास सदगीरचे आईवडील, नातेवाईक पंचक्रोशीतील नागरिक, कुस्तीगीर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सदगीर व इतर मल्लांच्या हस्ते बलकवडे व्यायामशाळेचे कुस्ती आखाड्याचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांची गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com