Friday, April 26, 2024
HomeUncategorizedइंग्रजी शाळांच्या ‘फी’चे स्ट्रक्चर कोलमडले

इंग्रजी शाळांच्या ‘फी’चे स्ट्रक्चर कोलमडले

सहा लाख शिक्षकांचे वेतन थकले : संस्थाचालक- शिक्षक सैरभैर

धरणगाव । प्रा. बी.एन. चौधरी 

कोरोनामुळे खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांकडे फी बाकी असल्यामुळे संस्थाचालक सुध्दा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी शाळांमधील शिक्षकांचे वेतन रखडले आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीचा प्रसार वाढला अन राज्यात 24 मार्च पासून संपूर्ण लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली. परंतु त्याच्याही 10 दिवस आधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था 14 मार्चपासून बंद करण्याचे राज्य शासनाने आदेश दिले. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांचे लाखो रुपये फीच्या स्वरूपात पालकांकडे थकले. इंग्रजी शाळांचे जवळपास 30 ते 40 टक्के फी ही पालकांकडे थकीत आहे व ग्रामीण भागातील संस्थाचालकांची याहीपेक्षा वाईट परिस्थिती आहे.

ग्रामीण भागातील जवळपास सर्वच शाळांची 50 टक्के फी थकीत आहे. ग्रामीण भागात पालक नेहमीच शेवटच्या परीक्षेपर्यंत फी भरण्याचा प्रयत्न करतात. शासनाने पहिल्या लॉकडॉऊनची घोषणा केली त्यावेळी लॉकडाऊन 21 दिवसाचे होते. त्यानंतर ते दोनवेळेस वाढवण्यात आले व आता 18 मे पर्यंत करण्यात आलेले आहे. त्यात शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांनी आदेश काढला, की लॉकडाऊन असेपर्यंत इंग्रजी शाळांनी फीसाठी सक्ती करू नये. या आदेशाचे संघटनेच्या शाळांनीही पालन केले. परंतु लॉकडाऊन आता 60 दिवसापेक्षा जास्त वाढल्यामुळे इंग्रजी शाळांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शाळांकडे शिल्लक असलेला पैसा फेब्रुवारी-मार्च महिन्यांची शिक्षकांच्या पगारासाठी खर्च करण्यात आला. परंतु आता राज्यातील सहा लाख शिक्षक, 80 हजार स्कूल बस चालक व जवळपास एक लाख शिपाई तसेच आया यांच पगार रखडले. या सर्वांच्या एका महिन्याच्या पगारा पोटी

- Advertisment -

ताज्या बातम्या