नाशिक शहरात दिवसभरात दहा रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; दोन पोलिसांचा समावेश, अशी आहे हिस्ट्री…
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात दिवसभरात दहा रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; दोन पोलिसांचा समावेश, अशी आहे हिस्ट्री…

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात सायंकाळी चार वाजेपर्यंत दहा रुग्ण करोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयातील हे पोलीस असल्याचे समजते. तसेच आज सकाळी नवीन नाशिकमधील साईबाबा नगर उत्तमनगर येथील एक तर जुन्या नाशकातील प्रमोद गल्लीतील रुग्ण करोनाबाधित आढळून आले होते.

दरम्यान, सायंकाळी चार वाजता आलेल्या अहवालात नाशिक महापालिकेच्या हद्दीत पुन्हा सहा रुग्ण बाधित आढळून आले आहेत.  यामुळे नाशिक शहरातील बाधितांची संख्या १६० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. आतापर्यंत ८ करोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अशी आहे नाशिक शहरात आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री

आज सकाळी आलेल्या अहवालात साईबाबा नगर,उत्तम नगर सिडको येथील ४५ वर्षीय महिला दोन दिवसांपूर्दिवी त्रास होत असल्याने इ एस आय सातपूर येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाली होती. यानंतर या महिलेचे स्वब घेण्यात आले. दरम्यान, या नमुन्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. यामध्ये ही महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

दुसरा रुग्ण  प्रमोद गल्ली जुने नाशिक येथील २१ वर्षीय युवक आहे. रविवारी ( दि.२४) रोजी सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यावेळी त्याचे स्वाब घेण्यात आले होते. आज या  रुग्णाचा  अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तिसरा रुग्ण लेखानगर सिडको येथील रहिवाशी ६२ वर्षीय वयोवृद्ध यांना बुधवारी (दि.२७) रोजी त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले असता त्यांचे स्वाब घेण्यात आले. या नमुन्तेयांचा अहवाल आज प्राप्त झाला. यात ही वयोवृद्ध व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चौथा रुग्ण कमोद गल्ली जुने नाशिक येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व गणेश नगर (कर्मा हाईटस) द्वारका परिसरातील ७० वर्षीय व्यक्ती यांचा अहवाल करोना बाधीत आलेला आहे.

पाचवा रुग्ण  क्रांतीनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गणेश वाडी पंचवटी येथील ३४ वर्षीय व्यक्ती आहे. त्याला त्रास जाणवू लागल्याने  त्याच्या घश्याचे स्वाब घेण्यात आला होता. या नमुन्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सहावा रुग्ण  सिताराम कॉलनी गोदा पार्क रामवाडी येथील ३१ वर्षीय रहिवाशी आहे.  मुंबईहून कंपनीच्या कामानिमित्त ते नाशिकला आलेले होते.  आज त्यांचा अहवाल करोना बाधीत आलेला आहे.

सातवा रुग्ण महालक्ष्मी थिएटर येथील रुग्णाच्या संपर्कातील व त्यांच्या कुटुंबातील १६ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर आठवा रुग्ण सिन्नर फाटा येथील २६ वर्षीय रहिवाशी हा नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने करोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर सिन्नर मध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित दोन्ही पोलीस हे आडगाव पोलीस मुख्यालय येथील असून मालेगावी ते कर्तव्यावर असल्याचे बोलले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com