नाशिक शहरात प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या १७ वर; १० ठिकाणचेे निर्बंध हटवल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या १७ वर; १० ठिकाणचेे निर्बंध हटवल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय बनलेला असतांनाच शनिवारी (दि.22) शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रापैकी सहा क्षेत्रातील निर्बंध आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रद्द केले.

तसेच नवीन बाधीत रुग्ण आढळल्याने शहरात नवीन 4 भागात प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्तांनी जाहीर केले आहे. यामुळे शनिवारपर्यत शहरात एकुण झालेल्या 44 प्रतिबंधीत क्षेत्रापैकी 27 क्षेत्रातील निर्बंध मागे घेण्यात आल्याने आता शहरात 17 प्रतिबंधीत क्षेत्र शिल्लक आहे.

गुरुवारी (दि.21) रोजी सुप्रभात वसाहत रामकृष्णनगर संजीवनगर सातपूर, मोठा राजवाडा नाशिक, नाईकवाडीपुरा, शिवाजीनगर भारतनगर व पंचवटीतील राठी संकुल असे भाग प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आल्याने शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या 40 झाली होती. त्यांनंतर दि.22 मे रोजी 8 करोना बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर लेखानगर नवीन नाशिक, मुमताझनगर वडाळा, राणाप्रताप चौक नवीन नाशिक व शनिमंदीरामागे दिंडोरीरोड असे चार नवीन प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्तांनी जाहीर केल्यामुळे 6 एप्रिल ते 23 मे पर्यत शहरात एकुण 44 प्रतिबंधीत क्षेत्रांची नोंद झाली असुन टप्प्या टप्प्याने नवीन रुग्ण आढळून न आल्याने आत्तापर्यत आयुक्तांनी 27 प्रतिबंधीत क्षेत्रातील निर्बंध हटविल्याने आता शहरात केवळ 17 प्रतिबंधीत क्षेत्र शिल्लक आहे.

नवीन प्रतिबंधीत क्षेत्रात या भागात वैद्यकिय पथकांकडुन घरोघरी सर्वेक्षणाचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरू करण्यात आले आहे.
तसेच शहरात गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात 12 बाधीत रुग्णांपैकी 5 रुग्ण हे शहरातील असुन उर्वरित 7 रुग्ण शहराबाहेरील होते. यानुसार महापालिका आयुक्तांकडुन मोठा राजवाडा नाशिक, नाईकवाडीपुरा व शिवाजीनगर वडाळा पाथर्डीरोड असे तीन भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.22) रोजी रात्री शहरात 11 रुग्ण आढळून आले आणि आज (दि.23) रोजी दुपारी 2 रुग्ण आढळून आल्याने शहरात नव्याने दोन प्रतिबंधीत क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

निर्बंध हटविण्यात आलेले प्रतिबंधीत क्षेत्र…

गोविंदनगर (मनोहरनगर), नवश्या गणपती गंगापूर, धोंगडेमळा ना. रोड, समाजकल्याण वसतीगृह, संजीवनगर (सातपूर – अबंड लिंकरोड), म्हसरुळ वृंदावननगर, सावतानगर, उत्तमनगर (नवीन नाशिक), मालपाणी सेफ्रॉन पाथर्डी फाटा, सातपूर कॉलनी, जनरल वैद्यनगर, बजरंगवाडी , शांतीनिकेतन चौक गंगापुररोड, माणेक्षानगर द्वारका, समतानगर, पाटील लेन, हनुमान चौक नवीन नाशिक, जाधव संकुल, हिरावाडी पंचवटी, श्रीकृष्णनगर सातपूर, सागर व्हिलेज धात्रक फाटा, हरिदर्शन सोसायटी धात्रक फाटा, आयोध्यानगरी हिरावाडी, तक्षशिला सोसायटी कोणार्कनगर, तारवालानगर व इंदिरानगर

Deshdoot
www.deshdoot.com