तळेगांव दिंडोरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
स्थानिक बातम्या

तळेगांव दिंडोरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील १४ वर्षीय मुलगा बिरोबा येथील विहिरीवर पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यश कांतिलाल उगले (वय १४) असे या मुलाचे नाव आहे. तो दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये ८ व्या इयत्तेत शिकत होता. मुलाच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

काळ सायंकाळी यश घराकडे परतला नाही. आईने शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही. रात्र उलटल्यानंतर सकाळी कुणीतरी यशच्या आईला तो बिरोबा येथील विहिरीकडे जाताना दिसला होता असे सांगितले. त्यानंतर विहिरीकडे जाऊन बघितले असता मृतदेह तळाशी गेलेला असल्याचे दिसून आले.

त्यानंतर रामदास नामक पिंपळगाव केतकी येथील पट्टीच्या पोहणाऱ्यास याठिकाणी बोलविले. त्यांनी विहिरीतून पहिल्यात डुबकीत यशचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यश हा एकुलता एक मुलगा होता. अतिशय हुशार आणि मनमिळावू असलेल्या यशचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com