पाहीजे तो भाजीपाला योग्य दरात; थेट आपल्या दारात…’स्वाभिमानी’चे अभियान

पाहीजे तो भाजीपाला योग्य दरात; थेट आपल्या दारात…’स्वाभिमानी’चे अभियान

नाशिक | प्रतिनिधी

कालपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात संचारबंदी लागू केल्यानंतर सर्वत्र भाजीपाल्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून आले. अनेकांना तर यापासून वंचित देखील राहावे लागले. यापार्श्वभूमीवर नाशिकमधील स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या वतीने शेतातला भाजीपाला कमीत कमी दारात नागरिकांना उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. जगताप यांच्या अनोख्या संकल्पनेतून सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थित शहर वासियांना ताजा भाजीपाला, फळे मिळणे शक्य होणार आहे.

तसेच शेतकऱ्यांनाही शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठीदेखील मदत होणार आहे. यासाठी नाशिक शहरात ना नफा ना तोटा तत्वावर शेतकऱ्यांच्या शेतातून थेट भाजीपाला आपल्याला घरपोच मिळणार असल्याची घोषणा स्वभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे.

यामध्ये शहरवासीयांना द्राक्षे, कांदा, कांदापात, शीमला मिरची, भोपळा ,वांगी , टमाटे , मिरची व इतर उपलब्ध होणारा भाजीपाल्याचा समावेश आहे.

ऑर्डर देण्यासाठी सामूहिक सोसायटी मिळून द्यावी असे आवाहन स्वाभिमानीकडून करण्यात आले आहे. यासाठी वैभव जगताप 9763586889, 9423573407 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.