Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedकोरोनाचे संशयित नवीन १५ रुग्ण दाखल

कोरोनाचे संशयित नवीन १५ रुग्ण दाखल

तिघांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट; एकूण २७ अहवालाची प्रतीक्षा

जळगाव – 

जिल्हा कोरोना रुग्णालयात मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोनाच्या संशयित नवीन १५ रुग्णांना दाखल करण्यात आले. यातील नऊ रुग्णांचे स्वॅप घेवून ते धुळ्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. एकूण २७ रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

- Advertisement -

या रुग्णालयामार्फत आतापर्यंत एकूण १६२ रुग्णांचे स्वॅप धुळ्याला तपासण्यासाठी पाठवण्यात आले. त्यातील १३१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. त्यातील मेहरुणमधील एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

तर सालारनगरातील दुसर्‍या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी मंगळवारी चार रुग्णांना होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला. तसेच या रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत मंगळवारी ८७ रुग्णांची तपासणी केली. आतापर्यंत एकूण २८८९ रुग्णांची स्क्रिनिंग झालेली आहे.

 मृतांच्या अहवालावर नजर

जिल्हा कोरोना रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आलेल्या दोन महिलांचा सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातील एक महिला मध्यप्रदेशातील असून ती कर्करोगाने ग्रस्त होती. तर पिंप्राळ्यातील दुसर्‍या महिलेस श्‍वसनाचा त्रास होता.

या दोघं महिलांचे स्वॅप घेवून ते तपासण्यासाठी धुळ्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच एका बालिकेचा मृत्यू  खासगी दवाखान्यात झाला. त्यानंतर तिचा मृतदेह जिल्हा कोरोना रुग्णालयात आणण्यात आला. तिच्या मृत्यूचे कारण निश्‍चित करण्यासाठी मृत्यू पश्‍चात स्वॅप घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल मंगळवारी सायंकाळपर्यंत मिळाले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या