हतगड पाणीपुरवठा योजनेची कामं निकृष्ट दर्जाची; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
स्थानिक बातम्या

हतगड पाणीपुरवठा योजनेची कामं निकृष्ट दर्जाची; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

हतगड | लक्ष्मण पवार

सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सलेल्या हतगड  येथील पाणीपुरवठा योजनेची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून याबाबत चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अधिक माहिती अशी की, बोरगाव धरणापासून तीन किलोमीटर अंतरावरून हतगड गावासाठी पेसा निधी,१४ वित्त आयोग, ग्रामनिधी, यामधून लाखो रुपये खर्च करून कंत्राटदाराला काम देऊ केले जात आहे.

या कामास ८ ते ९ महिने झाले असूनही अद्याप गावाला पाणी पुरवठा चालू झालेला नाही.व गाव अंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईनचे इतके निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे की, ते पाईप वरती निघून आले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून काही ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागते आहे. ग्रामस्थ व सदस्य तोंडी तक्रार करत असल्याने याप्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

पाणी योजनेच्या कामात लाखो रुपयांचा निधी आतापर्यत खर्च झाला असून पायाभूत सुविधा मात्र अद्याप मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकारची सखोल चौकशी करून  दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com