Tuesday, April 23, 2024
Homeजळगाव४० हजारांची लाच घेतांना पुरवठा विभागातील चौघांना अटक

४० हजारांची लाच घेतांना पुरवठा विभागातील चौघांना अटक

जळगाव | प्रतिनिधी

रेशनिंग दुकानाचे लायसन्स वडिलांच्या नावावर करण्यासाठी ४० हजारांची लाच मागणार्‍या पुरवठा विभागातील दोघा महिला क्लर्कसह दोघा खाजगी इसमांना मंगळवारी पकडण्ङ्मात आले. जिल्हाधिकारी कार्ङ्मालङ्मातील पुरवठा शाखेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाचवेळी चौघांना लाच प्रकरण अटक करण्यात आल्याने ही आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेच्या अव्वल कारकून प्रमिला भानुदास नारखेडे (५७, रा, भुसावळ) व अव्वल कारकून पुनम अशोक खैरनार (३७, रा.जळगाव) तसेच खाजगी इसम व हमाल कंत्राटदार प्रकाश त्र्यंबक पाटील (५५, जळगाव) दुध डेअरी चालक योगेश नंदलाल जाधव (३३, रा, जळगाव) या चौघांना पकडण्ङ्मात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना चौकशीकामी एसीबी कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र त्यांना अटक नसल्याचे सांगण्यात आले. सूर्यवंशी यांचा लाच प्रकरणात सहभाग आहे वा नाही? हे गुन्ह्याच्या तपासाअंती निष्पन्न होणार आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी व निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर ङ्मांनी केली

- Advertisment -

ताज्या बातम्या