Video : अपंगत्त्व अपयशाचे कारण बनु नये; शरीरात साठ अवघड शस्त्रक्रिया झालेल्या स्टिफन व्हुर्मन्सच्या जिद्दीला सलाम

Video : अपंगत्त्व अपयशाचे कारण बनु नये; शरीरात साठ अवघड शस्त्रक्रिया झालेल्या स्टिफन व्हुर्मन्सच्या जिद्दीला सलाम

नाशिक । प्रतिनिधी

आपलं अपंगत्व आपल्या अपयशाचे कारण बनु नये यासाठी जर्मनीचा स्टिफन भारतभ्रमण करुन जनजागृती करत आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणुस कुठल्या कुठे पोहोचू शकतो याची अनेक उदाहरणे आहेत. जिंकण्याची आशा असली की, माणुस मागे फिरुन पाहत नाही अशीच काही कथा आहे जर्मनीच्या स्टिफन व्हुर्मन्स यांची.

कंबरेपासून खाली पुर्णपणे दिव्यांग असूनही स्टीफनने पॅराप्लेजिक सायकलिस्टने अख्खा देश पालथा घातला आहे. विशेष म्हणजे नागरीकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्टिफनने काही प्रादेशिक भाषांतीन वाक्यही पाठ करून ठेवले आहेत ज्याच्या माध्यमातून स्टिफन लक्ष वेधून घेतो. आपल्यावर ओढवलेल्या अपंगत्वामुळे स्टीफन झोपलेल्या अवस्थेत येऊन सायकल सायकल चालवितात.

आज नाशिकमध्ये स्टिफनचे आगमन झाले त्यावेळी त्याने नमस्कार नाशिककरहो! जय महाराष्ट्र म्हणत पहिल्याच भेटीत नाशिककरांना आवाक केले. यावेळी विविध क्षेत्रातील नाशिककर आणि सायकलीस्टच्या वतीने स्टीफनचे मनोभावे स्वागत करण्यात आले.
2005 सालापासून मी भारतात आहे. त्यामूळे येथील वाहतूक कोंडी, स्पीड ब्रेकर्स याचा दांडगा अनुभव मला आहे. त्यामूळे सायकल चालवताना मला भारतात काहीच वेगळं वाटत नसल्याचे स्टिफन म्हणतो.

स्टिफनने अपंगत्व आपल्या अपयशाचे कारण बनू नये यासाठी राज्यातल तमाम दिव्यांगांना सकारात्मक संदेश दिला आहे. स्टिफन आजही स्वतःची कामे स्वतः करतो. त्याला कुणाच्या आधाराची आवश्यकता नाही. नियमित आहार, फळांचा समावेश हे स्टिफनच्या तंदुरुस्तीचे गमक असल्याचे तो म्हणतो.

कोल्हापुरपासून सुरु झालेला स्टिफनचा सायकलीवरचा प्रवास कराड, सातारा, पुणे, नारायणगांव, संगमनेर मार्गे आज नाशिकमध्ये आता. उद्या स्टिफन ठाण्याला प्रयान करणार आहे. उद्याचे 150 किमी अंतर पार करून परवा (दि.19) स्टिफन आठ दिवसांत 650 किमी सायकल प्रवासाचा टप्पा पुर्ण करणार आहे.

सकाळी नाशिकच्या काही सायकलीस्टने स्टीफनसोबत सायकल चालवून स्टिफनचे स्वागत केले. नाशिककरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल स्टीफनने आनंद व्यक्त करत आभार मानले. मुंबईतील रत्ननिधी सामाजिक संस्था आणि इंडियन मर्चंट चेंबर यांच्या सहकार्यांने स्टिफन जनजागृती करत आहे. याप्रसंगी नाशिक सायकलीस्टच्या वतीने स्टीफनला जर्सी देण्यात आली. यावेळी डॉ.महेंद्र आणि हितेंद्र महाजन, विजय काकडे, डॉ. मनिषा रौंदळ, स्नेहल देव, नलिनी कड, किशोर घुमरे यांच्यासह नाशिक सायकलीस्टस् उपस्थित होते.

स्टीफन म्हणतो…

सायकल चालवा…सायकलीचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे आपल्या निरोगी आरोग्यासाठी सायकलचा व्यायाम उत्तम आहे. तर वाढलेल्या ग्लोबल वार्मिंगवर प्रभावी उपाय म्हणून सायकलकडे बघितले गेले पाहिजे हा दुसरा फायदा सायकलचा आहे.

सामाजिक बांधीलकी जपा

समाजात वावरताना अनेक घटना आपण बघत असतो. दिव्यांग व्यक्ती दिसला की, त्याच्याकडे दुर्लक्ष होते. औचित्य पाहून सामाजिक बांधीलकी तात्पुरत्या स्वरुपात जपली जाते, कार्यक्रम संपला की सगळं विसरुन स्वार्थाकडे प्रत्येकजन जातो. जे काही करा…कुणासाठीही करा ते मन लावून झाले पाहिजे. सामाजिक भान जपले गेले पाहिजे.

रत्नाकर आहेर, अध्यक्ष, नाशिक सायकलीस्ट

Related Stories

No stories found.