राज्याचा १५ हजार ५५८ कोटींचा कर परतावा केंद्राकडून लवकर मिळावा – उद्धव ठाकरे
स्थानिक बातम्या

राज्याचा १५ हजार ५५८ कोटींचा कर परतावा केंद्राकडून लवकर मिळावा – उद्धव ठाकरे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

राज्याचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली आहे.

केंद्र सरकारकडून राज्य शासनाला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी असून हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com