विराटने ‘या’ खेळाडूसाठी केली खास मराठीत इंस्टाग्राम पोस्ट
स्थानिक बातम्या

विराटने ‘या’ खेळाडूसाठी केली खास मराठीत इंस्टाग्राम पोस्ट

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : टीम इंडियाचा वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा क्रिकेट सामन्याची काल विराट सेनेने विजयाने सांगता झाली. या सामन्यात रोहित शर्मा के.एल. राहुल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकाची फॅन्समध्ये मोठी चर्चा झाली. मात्र, विराटने या विजयाचे श्रेय स्वतः न घेता शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांच्या अंतिम ओव्हर मधील अफलातून फलंदाजीला दिले आहे.

शार्दुलच्या या खेळीसाठी विराटने आज एक खास इंस्टाग्राम पोस्ट करून त्याचे कौतुक केले आहे, यात विशेष म्हणजे शार्दुलचे कौतुक करताना विराटने खास मराठीतुन पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

Tula maanla re Thakur ??? @shardul_thakur

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

याशिवाय काल सामन्याच्या सरतेशेवटी सुद्धा प्रतिक्रिया देताना विराटने शार्दुल आणि जडेजाच्या भागिदारीचा उल्लेख केला होता. जडेजा आणि ठाकूर यांच्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी संघाला मदत झाली, अशा शब्दात विराटने या दोघांचे कौतुक केले होते.

Deshdoot
www.deshdoot.com