सुरगाणा : राग अनावर झाल्याने मुलाकडून वयोवृद्ध मातेचा खून
स्थानिक बातम्या

सुरगाणा : राग अनावर झाल्याने मुलाकडून वयोवृद्ध मातेचा खून

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कौटुंबिक कारणातून आई व मुलगा यांच्यात झालेल्या भांडणातून राग अनावर झाल्याने मुलाने आईच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुनेने नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुरगाणा तालुक्यातील सतखांब गावातील सुभाष नगर परिसरात गावीत कुटूंबीय राहतात. सोमवारी सोनीबाई गावीत यांचे मुलगा देवीदास गावित (३७) याच्या सोबत वैयक्तिक करणातून भांडण झाले.

आई सोनीबाई या केळीची माळी या ठिकाणी आपल्या शेतावर काम करण्यासाठी निघुन गेल्या होत्या. त्यानंतर संशयित आरोपी देवीदास याने मद्य प्राशन करत सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आईसोबत भांडणाची कुरापत काढली.

भांडणाचा जाब विचारत आई सोनीबाई हिच्या गळ्यावर, गालावर तसेच पोटावर कुऱ्हाडीने घाव घालत जीवे ठार मारले. दरम्यान, हा सर्व प्रकार पत्नी सरलाबाई हिच्या समोर घडल्यामुळे तिने पतीच्या विरोधात सुरगाणा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी देविदास यास ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com