स्मार्ट रोडवरून अंधांना मार्गदर्शन करण्यासाठी खास टाईल्सचा वापर
स्थानिक बातम्या

स्मार्ट रोडवरून अंधांना मार्गदर्शन करण्यासाठी खास टाईल्सचा वापर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रशांत निकाळे

नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित होणार्‍या स्मार्ट रोडचे लवकरच उद्घाटन होणार आहे. अशोक स्तंभ येथील जंक्शनचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने स्मार्ट रोडचे काम अजूनही सुरूच आहे. स्मार्ट रोड नेमका कसा असा अनेकांना प्रश्न पडतो. दररोज आपली नवीन-नवीन वैशिष्ट्ये स्मार्टरोडची सध्या दिली जात आहेत.

स्मार्ट रोडवर चालत असताना त्या रस्त्यावर पिवळ्या रंगाच्या टाईल्सच्या जाळ्या बद्दल आश्चर्य नक्कीच वाटते. अनेकांना याबाबत अनेक प्रश्न पडतात. नाशिककरांनाही याबद्दल उत्सुकता आहे. कुतूहलाने प्रत्येक जन चालताना आपलेच निष्कर्ष लावत आहे. त्या पिवळ्या रंगाच्या टाईल्स हे एक रेखा मार्ग आहे.

ते स्मार्ट रोडचे एक वैशिष्ट आहे. त्या पिवळ्या फरश्या सामान्य लोकांसाठी नसून नाशिकमधील दिव्यांग बांधवांंसाठी आहेत. स्मार्ट रोडवरील येल्लो टाइल लाइन अथवा रेखा मार्ग हा अंधांसाठी आहे. स्मार्ट रोडवरील पिवळ्या फारश्या या सुमारे 1 सेंटीमीटर ने वर आलेल्या आहेत. या किंचितशा वर आलेल्या फारशा अंध लोकांसाठी स्मार्ट रोडवर चालताना मार्ग दर्शवतील अनेक स्मार्ट सिटी अधिकार्‍यांना सांगितले आहे.

अंध वापरत असलेल्या काठीने लगेचच या विशेष फारशा त्यांना जाणवतात. एकमेकांना जोडलेल्या असलेल्या फरशांची रचना अंधांना त्यांच्या मार्गासाठी मदत करेल. टाईल्स अंधांसाठी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार बनविल्या आहेत.

यलो लाइन टाईल्स हे स्मार्ट रोडचे एक वैशिष्ट्ये अंधांना खूप उपयुक्त ठरेल. हे त्यांना रस्त्यावर मुक्तपणे फिरण्यास मदत करेल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तेथे फरशा बसविलेल्या आहेत. रस्ता पूर्णपणे उपयोगात आल्या नंतर याचा वास्तविक उपयोग दिसून येईल.

टॅक्टाईल पेविंग

अंधानसाठी स्मार्ट रोडवरील पिवळ्या टाईल्सची जाळे हे वैशिष्ट्ये खूपच चांगले आहे. त्याला टॅक्टाईल पेविंग असे म्हणतात. हे वैशिष्ट्य आंतरराष्ट्रीय मानदंडांसह स्मार्ट रोड मध्ये समाविष्ट केले गेले आहे. यात गोलाकार वर्तुळ असलेल्या फारश्या थांबण्याचा संकेत देतात तर आयाताकृती डीसाईन चालण्यासाठी सांगतात.

Deshdoot
www.deshdoot.com