Video : सोशल मीडियात अनोख्या ‘स्मार्ट’ साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल
स्थानिक बातम्या

Video : सोशल मीडियात अनोख्या ‘स्मार्ट’ साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

सध्या सर्वत्र लग्नसराई जोरदार सुरु आहे. गावागावांत ढोल ताशाच्या गजरात लग्नसराईचा उत्साह बघायला मिळतो आहे. अशातच सोशल मीडियात साखरपुड्याचा एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे.

जिकडे तिकडे प्रत्येकाच्या तोंडी या अनोख्या साखरपुडयाची जोरदार चर्चा आहे. कुणी या साखरपुड्याला स्मार्ट साखरपुडा म्हटले तर कुणी संस्कृतीवर बोट ठेवत सूचनाही केल्या.

मराठी जोडप्याचा हा व्हिडीओ असून मुलामुलीच्या दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र येत नोकरीच्या निमित्ताने परदेशात असलेल्या आपल्या मुलामुलींचा साखरपुडा आपल्या संस्कृतीप्रमाणे पार पाडला.

स्मार्टफोनवर व्हिडीओ कॉल करून हा साखरपुडा पार पडला यामध्ये वर मुलाच्या औन्क्षणापासून वधूच्या शृंगारापर्यंत सर्व वस्तू ऑनलाईन दाखविण्यात आल्या. यादरम्यान फोटोसेशनदेखील करण्यात आले.

विशेष म्हणजे वधूकडच्या महिला मंडळाने स्मार्टफोनलाच पदर देखील घालून दिल्याने अनेकांनी संकल्पनेचे स्वागत केले तर काही पाहुण्यांनी हशादेखील घरात पसरवला.

घरगुती सोहळ्यात पार पडलेल्या या साखरपुड्यात फोटोसेशन आणि व्हिडीओसेशन अगदी जोरदारपणे सुरु असताना या व्हिडीओमध्ये दिसून येते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक शोध लावले मोठी प्रगती झालेली सर्वत्र बघायला मिळते आहे. याचाच एक भाग म्हणून हा साखरपुडा विसरता येणार नाही असे काही नेटकरी याप्रसंगी सांगायला विसरत नाहीत.

Deshdoot
www.deshdoot.com