चौसाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
स्थानिक बातम्या

चौसाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

दिंडोरी | प्रतिनिधी 

तालुक्यातील चौसाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात ६० वर्षीय वृद्धा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मीराबाई सावळीराम जोपळे असे या महिलेचे नाव असून महिलेवर उपचार सुरु आहेत.

मीराबाई सावळे शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महिलेची परिस्थिती बेताची असून त्यांच्या उपचाराचा खर्च वन विभागाकडून करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. वन विभागाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावीत, सदाशिव गावीत, पोलीस पाटील संदीप जोपळे व ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com