मोबाईल अ‍ॅपद्वारे देशाची सोळावी जनगणना; दोन टप्प्यात कार्यक्रम; आधार नंबर बंधनकारक

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

देशाच्या 2021 च्या जनगणनेला एप्रिलपासून प्रारंभ होत असून देशाची ही सोळावी जनगणना असणार आहे. यंदाच्या जणगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारकडून या कामासाठी मोबाईल अ‍ॅप वापरले जाणार आहे. तसेच फॉर्मवरदेखील माहिती भरली जाणार आहे. परिवाराची माहिती गोळा करताना आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकांची देखील नोंद केली जाणार आहे. दोन टप्प्यात जणगणना कार्यक्रम राबवला जाणार आहे.

देशाची पहिली जणगणना 1872 मध्ये झाली. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी ती घेण्यात आली. त्यानंतर 1981 मध्ये देशात एकाचवेळी जनगणना करण्यात आली. आतापर्यंतची ही सोळावी तर स्वातंंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. देशात सर्वच क्षेत्रात डिजिटलायजेशन होत असून यंदाची जनगणनादेखील त्यास अपावद नाही.

मोबाईल अ‍ॅपद्वारे जनगणना करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. त्यामध्ये घर रचना, परिवारातील सदस्य, स्वतंत्र व एकत्र कुटुंब, मोबाईल नंबर, आधारकार्ड नंबर, शौचालय आहे का?, एलपीजी व एनपीजी जोडणी, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, टीव्ही आहे का?, डीटीएच की केबल जोडणी?, इंटरनेट वापरता का?, लॅपटॉप किंवा संगणक आहे का?, स्मार्टफोन वापरता का?, दुचाकी अथवा चारचाकीचा वापर करतात का? यासह इतर माहिती अ‍ॅप व फॉममध्ये भरली जाणार आहेत.

देशभरात हा कार्यक्रम दोन टप्प्यात राबवला जाणार आहे. 2021 ची जनगणना दोन टप्प्यात केली जाईल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत पूर्ण केला जाईल. त्यात घर यादी, मानवी आस्थापनाची स्थिती, गृहनिर्माण प्रक्रियेतील कमतरता, कुटुंबांमध्ये उपलब्ध सोयीसुविधा आदींची माहिती गोळा केली जाईल. तर जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी- मार्च 2021 मध्ये केला जाईल. त्यात प्रत्येक व्यक्तीची गणना करून त्यांच्या वैयक्तित नोंदी घेतल्या जातील. जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी या कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर असणार आहेत.

जनगणनेच्या कामासाठी शिक्षक जुंपणार

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कामाचर शीण उतरत नाही तोच राष्ट्रीय मतदार पडताळणीच्या कामाला शिक्षकांना जुंपण्यात आले होते. येत्या 29 फेब्रुवारीला त्याची मुदत संपुष्टात येत आहे. त्यानंतर लगेच शिक्षकांना जनगणेच्या कामाला लागावे लागणार आहे.

कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

जनगणनेच्या कामाची माहिती व बारकावे समजावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी अधिकारी व सेवकांसाठी कार्यशाळा झाली. त्यात मोबाईल अ‍ॅपमध्ये व फॉर्मधील रकान्यात माहिती कशी भरावी, जनगणना कार्यक्रमाचे स्वरूप आदींची माहिती देण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *