चुलत भावाच्या मारहाणीत बहिणीचा मृत्यू; रविवार पेठेतील गंगावाडीतील घटना
स्थानिक बातम्या

चुलत भावाच्या मारहाणीत बहिणीचा मृत्यू; रविवार पेठेतील गंगावाडीतील घटना

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

घराच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी का मारले, याचा जाब विचारल्याने चुलत भावाने बहिणीस बेदम मारहाण करत तीचे डोके फरशीवर आदळले. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गंगावाडी, रविवारपेठ येथे घडली.

अश्विनी सतीष चव्हाण असे या घटनेत मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिगंबर ऊर्फ भैय्या संजय चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी किशोर रघुनाथ जाचक यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३) घराच्या गच्चीतील प्लायवुडवर पाणी का टाकले, असे अश्विनी चव्हाण यांनी दिंगबर चव्हाण यांना विचारना केली.

याचा राग आल्याने दिगंबर चव्हाण याने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी त्यांचे भाऊ मध्यस्थी झाले असता त्यांनाही दिंगबर चव्हाण याने मारहाण केली.

दरम्यान, त्याने अश्विनी यांचे केस पकडुन त्यांचे डोके फरशीवर आदळले. यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या. पोलिस ठाण्यात तक्रार करून त्या घरी गेल्या असता, त्यांना चक्कर येवून पडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरु असताना रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिगंबर चव्हाण याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com