तोंडाला मास्क लावले नाही; सिन्नरमध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा
स्थानिक बातम्या

तोंडाला मास्क लावले नाही; सिन्नरमध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर ! प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मास्क न बांधता मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ७ जणांच्या विरोधात हलगर्जीपणा करून मानवी जीवितास व व्यक्तिगत सुरक्षे कडे दुर्लक्ष केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

सकाळी सात वाजेच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांच्यासह हवालदार किरण पवार, चालक खुळे गस्तीवर फिरत असताना अन्सारी शाबाद साबुद्दिन (23 ) व अन्सारी बाबू उद्दीन मोहम्मद साबिर (50 ) दोघेही राहणार झापवाडी हे तोंडाला मास्क न बांधता फिरताना आढळून आले.

त्यामुळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी अनिल गोरेलाल निषाद (23 ) राहणार शांती नगर, संतोष रामदास कदम (35) राहणार सरदवाडी, अनिल लक्ष्मण सोनवणे (44 )राहणार डोखेनगर, सदाशिव निवृत्ती कर्पे (५७) राहणार स्वामी समर्थ नगर हे मास्क न बांधता फिरत असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले.

सध्या करोना विषाणूंचा फैलाव होत असून चेहऱ्यावर मास्क न बांधता फिरणे चुकीचे असून स्वतःबरोबरच मानवी जीविताचे सुरक्षेकडे दुर्लक्ष हलगर्जी पणा केल्याबद्दल व संचारबंदी असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला.

बारागाव पिंपरी रस्त्यावर फिरायला निघालेले डॉक्टर भानुदास सदाशिव आरोटे (38) यांनीही  मास्क बांधलेले नव्हते. त्यांनी आपली ओळख सांगून समोरच आपले हॉस्पिटल असल्याचे सांगूनही पोलिसांनी ऐकले नाही. त्यांच्यासह सर्व सात जणांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 188, 269 व 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com