सिन्नर : चुलत भावजयीवर अत्याचार करणाऱ्या दीराविरुद्ध गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

सिन्नर : चुलत भावजयीवर अत्याचार करणाऱ्या दीराविरुद्ध गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

वावी । चुलत भावजयीवर वर्षभरापासून जबरदस्ती करत अत्याचार करणार्‍या दीराविरोधात वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोडी बुद्रूक येथील पंढरीनाथ आव्हाड याने शेजारी राहणार्‍या चुलत भावजयीवर एक वर्षापासून जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने महिलेने भीतीपोटी वर्षभर त्रास सहन केला. (दि.१७) नोहेंबर रोजी आव्हाड याने महिलेला सुरेगाव येथे जबरदस्तीने दुचाकीवर बसवून व संगमनेर येथील पिंपळगाव देपा येथील एका महिलेची खोली भाड्याने घेऊन आठ ते दहा दिवस तिचे शोषण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शाब्दिक भांडण झाल्यावर आव्हाड याने जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्यानंतर सदर महिलेच्या तक्रारीवरुन वावी पोलीस ठाण्यात पंढरीनाथ आव्हाड यांच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोनि रणजीत गलांडे व सपोउनि काळे करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com