Video : विस्डम हाय स्कुलमध्ये लघुपटनिर्मिती कार्यशाळा उत्साहात
स्थानिक बातम्या

Video : विस्डम हाय स्कुलमध्ये लघुपटनिर्मिती कार्यशाळा उत्साहात

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

‘दैनिक देशदूत ’च्या वतीने गोवर्धन येथील ‘विस्डम हायस्कुलमध्ये ’शॉर्ट फिल्म’(लघुपट) संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना लघुपटाविषयी माहिती देण्यात आली.

लघुपट संकल्पना काय असते? विषय कसे घ्यायला हवेत? स्क्रिप्ट कशी असावी? शुटींग करताना काय काळजी घेतली गेली पाहिजे, संगीत कसे असावे या विषयावर निषाद वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

’दैनिक देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली जात आहे. लघुपट बनविताना समाजातील चुकीच्या गोष्टी कशाप्रकारे बदलता येतील यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.

’सिव्हिक सेन्स’ म्हणजेच सामाजिक भान कसे जपले गेले पाहिजे. याविषयी वाघ यांनी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनीदेखील वाघ यांना प्रश्न विचारत लघपटनिर्मिती समजावून घेतली. काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी तसेच अनुभव शेअर केले. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी शंका उपस्थित केल्या या शंकादेखील वाघ यांनी मार्गदर्शन करत निरसन केले.

लघुपटानिर्मितीसाठी आवश्यक असणारे लेखन, दिग्दर्शन, पटकथालेखन, संगीत आशय या विषयी मुलांना माहिती दिली. तसेच देशदूतच्या मार्फत सिव्हिक सेन्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असेही आव्हान केले. देशदूतच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा आणि फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी www.deshdoottimes.com या संकेस्थळाला भेट द्यावी.

Deshdoot
www.deshdoot.com