Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशाॅपिंग काॅम्पलेक्स, इलेक्ट्राॅनिक वस्तुंची दुकाने उघडणार; या आहेत अटी…

शाॅपिंग काॅम्पलेक्स, इलेक्ट्राॅनिक वस्तुंची दुकाने उघडणार; या आहेत अटी…

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लाॅकडाऊन हळूहळू शिथील केला जात आहे. केंद्र सरकारने आता छोटे शाॅपिंग काॅम्पलेक्स व दुकाने, टिव्ही, फ्रिज व इतर इलेक्ट्रानिक वस्तुंचे दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मोठे शाॅपिंग माॅल सुरु करता येणार नाही.

- Advertisement -

अर्थव्यवस्थेचे थांबलेले चक्र सुरु करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २० एप्रिलपासून लाॅकडाउन शिथिल करुन अटी व शर्तीवर उद्योग, व्यवसाय, शेती निगडित कामे व पूरक उद्योग सुरु केले आहे.

त्याचाच पुढील टप्पा म्हणजे आता विविध वस्तुंची विक्री करणारे छोटे शाॅपिंग माॅल, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रानिक्स वस्तुंची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र, मोठे माॅल सुरु करता येणार नाही ज्यांना परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी फक्त ५० टक्के कर्मचारी उपस्थिती राहिल. नगरपालिका क्षेत्रापासून ही सुरुवात केली आहे. सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, दुकानात सोशल डिस्टनचे पालन करणे हे नियम बंधनकारक असणार आहे. वरिल दुकानांना परवानगी देण्यात आल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या